परिपत्रक

औरंगाबाद विभागामध्ये ”थोडेसे माय-बापा साठी पण” हा उपक्रम विभागातील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खालील नमूद मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येईल.

WhatsApp Image 2021 07 16 at 5.41.16 PM 1

उपक्रम राबविण्याचा उद्देश :

६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठांचे वृद्धापकाळातील जीवन आनंददायी, सुखकर, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे.
गरजू व पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे.
ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त करून देणे.
ज्येष्ठ नागरिकांकडील कौशल्य, ज्ञान व अनुभव यांचा इतरांना फायदा करून देणे. तसेच त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांचे उत्पन्न वाढविणे
ज्येष्ठ नागरिकांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावणे.